होम मिनिस्टर’: महाराष्ट्राच्या माता-भगिनींच्या आनंदाश्रूंचा तो अलौकिक क्षण!’

28 comments

  • कठीण परिस्थितीवर मात करून आपले आयुष्य कसे घडवायचे आहे हे आपल्या हातात असते हे विशाल ने दाखवून दिले आहे याचा तरुणांनी आदर्श घ्यावा तुझ्या कार्याला सलाम तु महाराष्ट्रातील नं 1चा होम मिनिस्टर निवेदक बनावे हिच सदिच्छा

    • लेखकाची भूमिका योग्य निभावली आहे. अतिशय सुंदर शब्दांची मांडणी. परिस्थितीला साजेल अशी. विशाल भाऊंनी अगदी शून्यातून हे होम मिनिस्टर रुपी विश्व उभ केलं आहे. माणसाचं जीवन हे संकटांनी जास्त सजलेल आहे. या संकटांशी दोन हात करून त्यांनी यशाची व्याख्या स्वतः तयार केलीये.त्यांच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अगदी खेड्यापाड्यातील शेताच्या बांधावर सतत काम करत असणाऱ्या स्त्रियांना हक्काच व्यासपीठ मिळवून दिल. त्या व्यासपिठावर उभे राहून त्या स्त्रियांना आपल्या भावना व्यक्त करता आल्या. एरवी ज्वारीचं कणीस हातात घेऊन उभ्या असणाऱ्या महिलां आता हातात हळू हळू माईक घेऊ लागल्या. या कार्यक्रमात हरवलेली नाती सुद्धा जवळ आली. नात्यामध्ये दुरावा निर्माण झालेल्या सख्या बहिणी जवळ आल्या. एकमेकांपासून दूर झालेले सख्खे भाऊ एकमेकांना मीठी मारून रडू लागले. अनेक जणांना नऊ महिने आपल्या पोटात घेऊन मातृत्वाचे नाते जपणाऱ्या आपल्या आईचे महत्त्व कळले. आणि कुटुंबाचे ओझे आपल्या खांद्यावर घेऊन रात्रंदिवस काबाडकष्ट करणारा बाप ही साऱ्या जगाला कळला. या सगळ्या घटना माझ्या डोळ्यासमोर घडलेल्या सत्य आहेत. लिहाव तितकं कमीच आहे. या शेतकऱ्याच्या पोराचं नाव गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत व्हावं हीच अपेक्षा. यासाठी अपेक्षा आहे ती रसिक मायबाप यांच्या आशीर्वादाची. विशाल भाऊ खूप खूप शुभेच्छा 💐

  • विशाल दादा मी ही तुमच्याच गावचा आहे तुमचा संघर्ष मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. अगदी शून्यापासून सुरवात करून आज तुम्ही जे स्वतःच विश्व निर्माण केलेलं आहे ते पाहून तुमचं कौतुक करेन तेवढं थोडंच आहे. तुम्ही अनेक तरुणांना प्रेरणा दिली आहे कि तुमच्याकडे जिद्द, सातत्य आणि संयम असेल तर काहीही सिद्ध करू शकता. तुमच्या पुढील भविष्याच्या वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!!

  • तुमचं लेखन अतिशय हृदयस्पर्शी आहे. ‘होम मिनिस्टर’च्या यशामागे विशाल पाटील यांच्या आयुष्याचा संघर्ष, वेदना आणि उभारी तुम्ही प्रभावीपणे मांडली आहे

  • आमचे सहकारी मित्र श्री. विशाल पाटील यांचा संघर्ष जवळून पाहिला आहे. शून्यातून त्यांनी हे विश्व निर्माण केले आहे त्यांची प्रगती इथून पुढे ही अशीच होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

    त्याचबरोबर आपण केलेलं लिखाण ही अप्रतिम आणि मुद्दे सुद मांडणी आहे. असेच पुढे आपण ही सामाजिक आणि ग्रामीण विषयावर लिहीत चला 👍👍👍👍👍

  • वा! अतिशय प्रेरणादायी प्रवास. संघर्षातून घडलेलं यश खूप उंचावून ठेवतं. मनापासून सलाम. अशी कहाणी अनेकांना नवीन उर्जा देते. खरंच… माणुसकी आणि जिद्द यांचं उत्तम उदाहरण. ग्रामीण महाराष्ट्रातूनही अशी चमकदार स्वप्ने उंच भरारी घेतात हे पाहून आनंद वाटतो. मामा-मामी आणि मित्रांची साथ—खरं नात्यांचं सौंदर्य. ‘होम मिनिस्टर’ होण्यामागचा इतका संघर्ष कळून खूप भावलं. जीवनात काहीही अशक्य नाही हे पुन्हा जाणवलं.जिद्द आणि मायेच्या आधारावर मिळवलेलं यश—अप्रतिम! धन्यवाद!👍🏻

  • लेखन खूप छान झाले आहे.खूप काही बोलायचं होत मला पण शब्द सुचेनत आज विशाल भाऊ च्या संघर्ष पाहता डोळे भरून आले येथून पुढे येणाऱ्या काळात काही मदत लागली तरी आम्हाला सुद्धा सांगत चला आम्ही सुद्धा तुमच्याबरोबरच आहोत.
    आणि कार्यक्रम बद्द्ल सांगायच म्हटलं तर अप्रतीम सादरीकरण एकमेव शब्द सांगेन
    पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.
    लेखकाचे मनस्वी आभार.
    धन्यवाद

  • खरच खूप संघर्षमय दिवसातून सुरू झालेला हा तुझा प्रवास आम्ही पहिला आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात हा आवाज आज पोहोचला आहे
    तुझ्या पुढील कार्यास आमच्या शुभेच्छा 💐💐

  • खरंच खूप सुंदर लेखन आहे तुमचे खूप खूप आभार तसेच तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
    तसेच लेखकाचे पण खूप खूप आभार
    धन्यवाद 🙏🙏

  • “मित्रा, तुझ्या प्रवासाच्या या वळणांवर उमटलेली प्रत्येक पावलं म्हणजे प्रेरणेच्या वाऱ्यावर झेप घेणारी उंच भरारीच वाटतात. तुझ्या कष्टांच्या कणाकणातून घडलेली ही वाटचाल आम्ही डोळ्यांनी पाहिलेली आहे … आणि मनाने अनुभवलेली आहे.
    निरभ्र आकाशासारखा शांत स्वभाव, धगधगत्या उन्हातही न थांबणारी जिद्द, पैशाच्या मोहापासून पूर्णतः अलिप्त असलेली तुझी निर्मळ वृत्ती यांनीच तुझ्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळंच तेज दिलं आहे. होम मिनिस्टर च्या प्रवासाला कोल्हापूरच्या ग्रामीण भागातल्या चित्रात रंग भरून त्यांना जिवंत करण्यापाठी मागे तुझा खूप मोठा मोलाचा वाटा आहे.
    नव्या संकल्पनांची ठिणगी पेटवणारा तू… आणि त्यातून उजळून निघालेलं तुझं आयुष्य म्हणजे संघर्षाच्या दगडावर कोरलेली ‘यशाची शिल्पकला’च जणू.
    जिथे इतरांची पावलं थबकतात, तिथून तू धाडसानं वाट काढतोस; जिथे माणसं मागे वळून पाहतात, तिथून तू पुढचा टप्पाही पार करून दाखवतोस.
    विशाल बेळवळेकर पाटील या नावाचा आज उच्चार झाला की, परिश्रमाची शक्ती, स्वच्छ मनाची ताकद आणि न थांबणाऱ्या इच्छाशक्तीचं तेज समोर उभं राहतं. निवेदक विशाल भाऊजी
    तुझा हा यशाचा प्रवास आम्हाला केवळ अभिमान देत नाही, तर जगण्याची नवी ऊर्जा देतो.
    मनापासून दाद आहे रे मित्रा… तुझ्या या प्रेरणादायी जीवनप्रवासाला.” खूप मोठा हो आणि नाव कमव समाज घडव… खूप शुभेच्छा आणि जीत शिंदे सर आपलं ही कौतुक आणि अभिनंदन आहे शब्दांची शिदोरी आपल्या लेखाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचविण्यासाठी.
    धन्यवाद….!

    निवेदक – पंकज तोडकर ( झुलपेवाडी )

  • हे लेखन केवळ कथा मांडत नाही, तर प्रत्येक ओळीतून माणुसकी, संघर्ष आणि कृतज्ञतेची खोल जाणीव पोहोचवते. शब्द इतके जिवंत आहेत की वाचक त्या प्रवासाचा भाग होतो. अशी संवेदनशील आणि समाजाला प्रेरणा देणारी लेखणी कधीही थांबू नये.

    — अजिंक्य कांबळे

Leave a Reply