वेटरची नोकरी ते जिल्ह्याचा ‘CET टॉपर’! दोन वेळा स्वप्नभंग होऊनही फिनिक्सप्रमाणे झेप घेणाऱ्या विजय शिंदे सरांची ही धगधगती महागाथा

34 comments

  • तुम्ही लिहिलेली पोस्ट खूप सुंदर आणि सर्वांना प्रेरणा देणारी आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये शिक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष तसेच नोकरी मिळवताना आलेले अपयश पचवून परत नव्या उमेदीने त्यांनी नोकरीसाठी केलेला प्रयत्न खूप प्रेरणादायक आहे.
    भाऊ तुम्ही लिहिलेली लेखणी खूप सुंदर आणि मनाला स्पर्शून जाणारी आहे. पुढील लेखन कार्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

      • लेखन प्रभावी, भावनिक आणि प्रवाही आहे. प्रसंगांचे तपशील जिवंतपणे उभे राहतात आणि वाचकाला कथेशी जोडून ठेवतात. भाषाशैली ओघवती असून प्रेरणादायी संदेश स्पष्टपणे पोहोचतो. थोडक्यात, हे लेखन माहितीपूर्ण तसेच मनाला भिडणारे आहे.

        • तुला एवढ सुचते कसं..निःशब्द आहे मी.. तुझ्या लेखणीत एवढी गंभीरता आणि तितकीच धार आहे. असाच हा प्रवास सुरू ठेव.. एक दिवस तू लिहिलेलं पुस्तक वाचायला नक्की मिळेल एवढी खात्री देतो.. लेखक म्हणून खूप नाव कमवशील..

      • लेखनात कथनाची ताकद ठळकपणे जाणवते. वास्तव अनुभव, संघर्ष आणि यश यांचा सुंदर समतोल साधलेला आहे. शब्दांची निवड नेमकी असून प्रत्येक परिच्छेद उत्सुकता निर्माण करतो. एकूण लेखन प्रेरणा देणारे आणि वाचकाच्या मनावर ठसा उमटवणारे आहे.

  • First thanks for heart – touching writing…
    वाचन करताना माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना दहा मिनिटाच्या कालावधीमध्ये डोळ्यां समोरून सरसर निघून गेल्या… पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात घडलेल्या सर्व घटनांचा उलगडा माझ्या हृदयामध्ये झाल्या… सर्व आठवणी हृदयाला स्पर्शून गेल्या. माणसाचा संघर्ष दुसऱ्याच्या तोंडून ऐकला तर त्याच्यासारखी प्रेरणादायी गोष्ट कोणतीच नाही.
    धन्यवाद ज्योतीराम पुन्हा एकदा माझ्या सर्व आयुष्य डोळ्यासमोर उभा केल्याबद्दल..👏👏

    • सर्वांना प्रेरणा देशील, आयुष्यात तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे.

    • नक्कीच. तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे. तुम्ही भावी आयुष्यात खूप यशस्वी व्हाल यात शंका नाही.

  • लेखणीत गंभीरता आणि तितकीच धार आहे. प्रसंगाचे तपशील जिवंतपणे उभे करण्यासाठी वापरलेली भाषा साधी पण तितकीच प्रभावी ठरते. लेखन भावनिक तसेच स्फूर्तीदायक आहे .

  • लेखणीत गंभीरता आणि तितकीच धार आहे. प्रसंगाचे तपशील जिवंतपणे उभे करण्यासाठी वापरलेली भाषा साधी पण तितकीच प्रभावी ठरते. लेखन भावनिक तसेच स्फूर्तीदायक आहे .

  • सरांच्या संघर्षपूर्ण जीवनाचे अप्रतिम सादरीकरण आपण केलेत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. जीवनाच्या संघर्षातून यशाकडे जाण्याचा मार्ग किती खडतर असतो हे सरानी आपल्या कृतृत्वातून सिद्ध केले. अष्टपैलू जीवनाची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आपल्या लेखनातून उमटली.

  • विजय शिंदे सरांच्या कष्ट आणि संघर्षाला सलाम!
    डी एड् ला आम्ही सोबत होतो. खरोखर खूप हुशार,नम्र व्यक्ती आहेत आणि उत्तम खेळाडू आहेत. भविष्यात ते मोठे अधिकारी नक्कीच बनतील, त्यासाठी शुभेच्छा!

  • विजय हा माझा विद्यार्थी त्याला जवळून मी पाहिलेला आहे दिंडेवाडीत कधीतरी त्याच्या रूमवर जाऊन त्याच्यावर लक्ष ठेवून चांगला घडावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्याचं फळ मी आज माझ्या डोळ्यांनी पाहत आहे विजय सारखा सुस्वाभावी मितभाषी हुशार,मनमिळावू खिलाडी वृत्तीचा विद्यार्थी माझ्या हातून घडला हे मी माझं भाग्य समजतो दहावीपर्यंत अर्धपोटी राहणारा विजय नेहमी माझ्या घराकडे यायचं आज विजय सुस्थितीत असताना मनाला आनंद वाटतो. विजय सारखा गुणी माणूस आजही संपर्कात आहे त्याच्या यशाची कमान सतत चढती राहो हीच विजेयला शुभेच्छा आणि जोतिबा तूझी लेखणी समाजातील विविध घटकांचा पैलू दाखवत राहो हीच प्रार्थना तुलाही मनःपूर्वक शुभेच्छा

  • विजय सरांची परिस्थिती… परिस्थितीला दोन हात करत केलेला संघर्ष हा आजच्या पिढीला नवल वाटेल;पण हे सत्य आहे. सरांनी आपल्या गावातील मुलांसाठी, समाजासाठी केलेले काम कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे… एखादा ऑस्कर पुरस्कार चित्रपटाला लाजवेल अशी सरांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी आहे… जीत…. सरांचा जीवन चित्रपट आम्हा सर्वांच्या समोर आणलास त्या बद्दल धन्यवाद… तुझ्या लेखणीला सलाम…

  • सतीश हा माझा वर्गमित्र आणि विजय ला मी त्याच्या लहान पनापासुन पाहतोय…दोघेही नेहमी हसत राहणारे आणि आलेल्या परिस्थिती ला न घाबरता सामोरे जाणारे….विजय ला त्याच्या चिकाटीसाठी सलाम.. तुझ्या पुढील प्रत्येक यशासाठी आतापासूनच तुझे अभिनंदन…

  • खरच एकदम प्रेरणादायी प्रवास सलाम आहे विजय सरांना💐💐💐💐💐👍👌

  • जितके हुशार तितकेच नम्र आदरणीय विजय शिंदे सर तुमची संघर्षमय जीवन कहाणी वाचून तुमच्याबद्दल चा आदर अजून वाढला आहे तुमची जिद्द चिकाटी व सामाजिक कार्यामुळे भावी पिढीसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहात ! तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!

  • लेख खूप भावला… मनाला कुठे तरी स्पर्श करून गेला.. आपल्या भागात असे अनेक हिरे फक्त परिस्थिती मुळे तळपायचे राहून गेले याचे दाखले आज अनेक मराठी शाळेच्या भिंतीवर लिहिलेले दिसून येतात… मोठी स्वप्ने उराशी बाळगून मोठं होताना परिस्थिती चे ओझे उभं राहू देत नाही… पण याच परिस्थिती ला पायाखाली तुडवून न्हवे तर तिला वाकवून पुढे जायची जिद्द काही काजव्या कडे असते.. जे आपल्या मिणमिणत्या प्रकाशाने कधी कधी भयाण अंधाराच्या उरात धडकी भरवतात.. विजय सर त्यातीलच एक 👍🏼👍🏼. एक उत्तम शिक्षक, गणितात कमालीचा हातखंडा आणि जिल्हास्तरीय एक उत्तम आणि सातत्याने नंबर मिळवणारा धावपटू एवढीच शिंदे सरांची आम्हाला ओळख होती पण आज खरा संघर्ष कळून आला.. 👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼

  • विजय माझा 8 वी पासूनचा जिवलग वर्गमित्र… त्याचा संघर्ष पुन्हा डोळ्यासमोर उभा राहिला.. चौकूळ या गावात इलेक्शन चा सर्वे मी विजय सोबत केला आहे.. विजय ने सर्वाना मी अधिकारी आहे असे सांगितले होते.. अगदी जगाशी संपर्क नसलेली माणसे अक्षरशा पाया पडत होती.. पाणी, वीज शासकीय योजना ची माहिती विचारत होती..त्यांचं एकच वाक्य.. विजय सर आमचा आधार आहेत.. जणू काय देवमाणूस…विजय वर इतकं प्रेम की नं सांगण्यासारखं… त्याची नोकरी पाहून मी त्याला म्हंटले होते.. तु इथं नोकरी करतोस.. पण मी आधी पाहिलेली शाळा साधी होती ती सरांनी चांगली खोली बांधून घेतली होती.. चारी बाजूनं जंगल असलेल्या ठिकाणी माझ्या या मित्राने हार नं मानता कामं केले.. त्याच्या संघर्षला आणि जोतिराम तुझ्या लेखणीला सलाम 🙏🏻

      • छान लिहितोस की…🤟🤟…खरच गरज आहे आजच्या पिढीचा पोरांना हे कळणे…काय भेटत नसताना एवढी जिद्द होती शिकण्याची सरांची….परिस्थिती किती वाईट असली तरी हार नाही मानली पाहिजे याचे एक उत्तम उदाहरणं सांगितले आहेस तू सरांचा वरून..आणि आता सर्व काही भेटतं पण पोरांची इच्छा नाही शिकण्याची अशी परिस्थिती आहे सध्या गावा गावात…मोबाईल आणि इंटरनेट चा युगात पोर जुने खेळ पण विसरून गेलेत आज … वाटत की शाळेचे दिवसच खूप छान होते….👍👍🤟

Leave a Reply