मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक डॉ.अशोक पाटील मी आज थोडं लिहिणार आहे एका नवीन पुस्तकाविषयी. आजची युग अत्यंत धावपळीचे आणि भौतिक साधनांच्या हव्यासापोटी निरंतर पळत राहणाऱ्या लोकांचे आहे. प्रत्येक जण माझे घर माझा संसार माझी बायको माझी पोर माझा परिवार यातच गुंतला आहे ,पण खरे सांगायचे झाले तर या स्वार्थाने बरबटलेल्या जीवन संसारात काही लोक अशेआहेत की ,स्वतः जे अनुभवलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठी अनेक संकटावर मात करत मार्ग काढत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो यासाठी झटत असतात ,त्यातीलच एक म्हणजे आमचे मामे भाऊ जोतीराम शिंदे होय .मित्रांनो मी ही गरिबीच्या असंख्य झळा सोसल्या आहेत ,अनुभवल्या आहेत. म्हणूनच माझ्या कोणत्याही लेखणीत काल्पनिकता नसून तळागाळातील प्रत्येक व्यक्तीची वेदना असते आणि म्हणूनच चिखल संघर्षाच्या पाऊलखुणा ज्योतीराम शिंदे लिखित या पुस्तकावर दोन शब्द लिहिताना कल्पकतेला आणि मनोरंजनाला बाजूला ठेवून व्यक्त होतोय………..
आयुष्य छान आहे थोडे लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे.
या कवी सुरेश भट यांच्या चार ओळीनुसार चिखल संघर्षाच्या पाऊलखुणा व्यक्तिचित्रणात्मक लेख संग्रहातील प्रत्येक लेख वाचल्यानंतर प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्यासमोर हाच आदर्श ठेवते की ,आयुष्य सुंदर आणि थोडेच आहे ,त्यामुळे रडत बसू नका प्रत्येक संकटाशी सामना करा ,जीवनात कितीही सुखदुःख चढ उतार आले तरी त्याच्याशी धीराने सामना करा एक दिवस विजय हा तुमचाच असेल .खरं सांगायच झाले तर चिखल संघर्षाच्या पाऊलखुणा हे पुस्तक माझ्या हाती पडलं आणि त्याचे मुखपृष्ठ पाहूनच ते पुस्तक वाचून पूर्ण करण्याचा माझा मोह आवरला नाही. मी रात्री जेवण करून तासात दोन तासात हे वाचून पूर्ण केलं. माझे अजूळ केळेवाडी असल्याने त्यातील प्रसंग, त्यातील व्यक्तिरेखा माझ्या आपल्याच वाटल्या. मी बालपणीचे दिवस तसेच शालेय जीवनातील दिवाळीची सुटट्या , मे महिन्याची सुटट्या या पुस्तकात रेखाटलेल्या परिसरामध्येच केळेवाडी मठ, दिंडेवाडी भांडीबांबर ,मानवळे इत्यादी परिसरामध्ये घालवलेल्या दिवसांचे काही कडू गोड आठवणी चित्ररूपात दिसू लागल्या .पुस्तकाचे लेखक जोतिरामहे माझ्यापेक्षा थोडे वयाने कमी असतील पण आम्ही सर्व भावंडे आणि मठावरील आमची सखे मामे भाऊ ,चुलत मामे भाऊ बहिनी आणि इतर अनेक पोरानी अनेक दिवस खेळण्या बागडण्यात तसेच शेत शिवारात आंबे ,काजू ,पेरू फणस ,करवंदे ,तोरणासारखा रानमेवा गोळा करण्यात एकत्र घालवले आहेत. त्या आठवणी काळाच्या ओघात वाहत गेल्या त्यातील काही जणांची नावे मला माहित आहेत तर काही नावे मी काळाच्या ओघात विसरूनही गेलो असेल. केळेवाडी गाव हे भुदरगडच्या पायथ्याशी निसर्गरम्य झाडाझुडपांच्या कुशीत बसलेले छोटेसे गाव आहे .तेथील संस्कृती, तेथील राहणीमान, राजकीय सामाजिक ,पारिवारिक तसेच मठावरील प्रत्येक कुटुंबातील चुलीपर्यंतच्या व्यथा आणि कथा भौगोलिक परिस्थिती इत्यादींचा लेखाजोखा मला थोडा बहुत माहित आहे .मी पाहिलेली मी अनुभवलेली साधी माणसं ज्योतीराम ने लिहिलेल्या पुस्तकातून मला पुन्हा अनुभवायला मिळाली .खरंच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहतात इथली माणसं .शिक्षण ,आरोग्य तसेच अनेक सुख सुविधांचा अभाव, प्रवासासाठी साधनांचा अभाव अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही इथली पोर शिकली मोठी झाली. इथली असंख्य पोर परिस्थिती समोर न झुकता जिद्दीन शिकून प्रत्येक क्षेत्रात केळेवाडी चे नाव उज्वल करू लागली. इतकेच नाही तर अनेकांनी आजही आपल्या जन्मभूमीशी नाळ घट्ट बांधून ठेवली आहे .आपण पाहतो की आज पोरं शिकतात मोठी होतात देश-विदेशात जातात आणि आपली जन्मभूमी गाव विसरून जातात पण या पुस्तकातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्याबरोबर गावची कशी भले होईल यासाठी धडपड करताना दिसत आहे. या पुस्तकातील प्रत्येक पानावर असणाऱ्या पाऊलखुणा या संघर्षाच्या आहेत आणि या संघर्षेचा वाटेकरी लेखकाच्या अवतीभवतीचा सारा गोतावळा आहे………
यातील पहिल्याच लेखात उत्तम या बाल मित्राचा शिखरापर्यंत पोहोचण्याचा संघर्षमय प्रवास आहे आणि कदाचित याच उत्तम च्या पायात असणाऱ्या विसंगत चपलाच्या जोडी घालून केलेला शैक्षणिक प्रवास आणि कदाचित त्याचे दर्शन मुखपृष्ठावर उमटलेले आहे. आज उत्तम व्यक्तिगत जीवनात सुखी आहे, तरीही त्याची तळमळ ही गावगाड्यातील प्रत्येक माणसासाठी काहीतरी करण्याची दिसून येत आहे .त्यानंतर संघर्षाच्या कुशीतून उगवून यशाच्या शिखराला कवेत घेणाऱ्या दयानंद भोईटे यांच्या जीवन प्रवासाची कहानी दुसऱ्या लेखात आहे. केळेवाडी चा सागर पुत्र आणि ती एकाकी झुंज यामध्ये परिस्थितीशी दोन हात करत सात समुद्रा पार देश सेवा करणाऱ्या एका योध्याची संघर्षमय कहाणी आहे. केळेवाडी चा सागर पुत्र आणि ती एकाकी झुंज मध्ये रवींद्र यांची यशोगाथा चित्रीत आहे .गावच्या मातीतून सीएच्या शिखरापर्यंत रंजीत दादांनी सिद्ध केलेल्या जिद्दीचे विवेचन आहे .हॉटेलमधील वेटर ते जिल्ह्याचा सीईटी टॉपर पर्यंत पोचलेला विजय शिंदे अक्षरशा परिस्थितीला गुडघे टेकायला लावतो, तर एका लेखांमध्ये प्रकाश मामांची रक्ता ची कहाणी अभिमानास्पद आहे. सुधाकर शिंदे परिस्थितीशी झुंज देत दुधाच्या व्यवसायावर मातीचे पांग कसे फेडतो,कुटुंबाला कसा आधार देतो त्याचा प्रेरणामय प्रवास आहे. विशालचा प्रवास एक वेगळीच कहाणी प्रस्तुत करतो .मनीषा यांची व्यक्तिरेखा तर गरीबी वर जिद्दीने मिळवलेला विजयच आहे. ऋतुराज चा प्रवास अपयश कितीही वाईट वेळ आली तरी खचून जाऊ नका हा संदेश देतो .चिखलातून खाकी पर्यंतचा प्रवास यामध्ये सुशांत मोरबाळेच्या खडतर प्रवासाची यशोगाथा आहे .म्हणजेच काय तर चिखल संघर्षाच्या पाऊलखाना जोतीराम शिंदे लिखित या पुस्तकांमधील सर्वच लेखातील व्यक्तिरेखा म्हणजेच चिखलातून जसं कमळ फुलाव तसेच संघर्षातून यशापर्यंत पोहोचण्याच्या विविध यथार्थवादी जीवन गाथा आहेत .या गाथा आजच्या नवतरुणांसाठी ,आजच्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी ठरतील यात शंका नाही .आता जोतीराम ने लिहिणे थांबवू नये आपल्या जन्मभूमीच्या प्रत्येक व्यथा आणि कथा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी पुन्हा लेखनी हातात घ्यावी एवढीच सदिच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो.
आपला– प्रा. डॉ अशोक बाळू पाटीलशिक्षण – एम. ए (समाजशास्त्र), एम. ए (हिंदी), बी. एड (हिंदी -इतिहास), पीएच. डी (हिंदी), रुरल जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन, मुद्रित शोधन कोर्स, हिंदी सुबोध प्रथम श्रेणी, हिंदी प्रवेशिका प्रथम श्रेणीपुरस्कार – साहित्यरत्न मानव सेवा पुरस्कार 2014, मुंबई संध्या साहित्य सेवादीप पुरस्कार 2015, अण्णाभाऊ साठे वाङ्मय पुरस्कार 2016, महाराष्ट्र गोमंतक पुरस्कार (शैक्षणिक साहित्य), श्री हनुमान मल्ल सोनी स्मृती सन्मान हरियाणा (शोधनिबंध को), अखिल भारतीय शिक्षक कला क्रीडा मंडळ शाखा सांगली का आदर्श शिक्षक पुरस्कार 2022, लायन्स क्लब ऑफ जत आदर्श शिक्षक पुरस्कार 2022. अन्य.. विविध आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कवि लेखक साहित्यक्, निर्भीड रोखठोक लेखन को पुरस्कार प्राप्त राजकीय विश्लेषक).
घरपोच पुस्तकांसाठी संपर्क.8898955593

Comment
Mast mast