बापाने शेळ्या राखल्या, आईने रक्ताचं पाणी केलं; विसंगत चपला घालून ६ किमी पायपीट करणारा ‘उत्तम’ आज जागतिक शिखरावर!

15 comments

  • जीत, तुझं लेखन वास्तव मांडतं. वाचकांच्या डोळ्यांसमोर चित्रफित उभी राहते. उत्तमचं जीवन प्रेरणादायी आहे. जिद्द आणि सकारात्मकता असेल तर परिस्थिती अडथळा ठरत नाही हे उत्तमने सिद्ध केले आहे. उत्तमची सुरूवात आणि सद्यस्थिती यातील फरक हा खूप मोठा प्रवास आहे, त्याची खूप मोठी achievement आहे. उत्तमसारख्या परिस्थितीशी संघर्ष करून स्वतःला सिद्ध करणारी व्यक्तिमत्त्वं आणि त्यांना लोकांसमोर आणणारी तुझी लेखणी अशीच प्रेरणादायी ठरो.

  • जीत माझ्या भावा मला तुझा खूपच अभिमान वाटतो. उत्तम च्या कष्टाचे त्याने केलेल्या मेहनती चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे त्याच्या यशाबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन. पण तुझ्यातले मी अनेक गुण पाहिले आहेत पण हे अप्रतिम पद्धतीने जे तुझे लेखन आहे हे खूपच मनाला भावूक करणारे आहे . लेख वाचतेवेळी संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहते…. खूप खूप अभिनंदन असेच लेक वाचनात येत राहूदेत. आणि ह्याच्यातून लोक प्रेरणा घेऊन आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याचा बोध घेतील.

  • केळेवाडीच्या मठावरील पोरांची चिकाटी न्यारीच…..
    जोतिबा, श्रावण,उत्तम ……
    तुमच्या शेळ्या – मेंढ्या राखणाऱ्या आई – वडिलांनी ठेवलेल्या तुमच्या नावांच अर्थ तुम्हीं कर्तुत्वाने सार्थ करून दाखवला.
    आपल्या सर्वांचा गुरू होण्याचं भाग्य मला लाभलं याचा सार्थ अभिमान आहे.

    • आदरणीय मुळीक सर,
      तुमचे शब्द वाचून मन भरून आले. केळेवाडीच्या त्या मठावर आणि निसर्गाच्या सानिध्यात आमचं बालपण घडलं, पण त्याला खऱ्या अर्थाने पैलू पाडले ते तुमच्यासारख्या गुरूंनी.
      आमच्या आई-वडिलांनी कष्ट सोसून आम्हाला शाळा शिकवली, पण त्या नावांना कर्तृत्वाची जोड देण्याचे बळ तुमच्या संस्कारांतून मिळाले. तुम्ही आम्हाला केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर जीवनातील चिकाटी आणि संघर्षाची ओळख करून दिली.
      आमच्यासारख्या सामान्य मुलांचा ‘गुरू’ होण्यात तुम्हाला अभिमान वाटतो, हे आमचे सर्वात मोठे यश आहे. तुमच्या आशीर्वादाची ही शिदोरी पाठीशी आहे, म्हणूनच आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो.

      तुमच्या चरणी नतमस्तक!

  • Great mm.jeetu bhai la pn amhi khup javalun pahile ahe tyachya sobat kahi divas rahilo ahe ..best person ahe ani tyachi paristhiti purvi halakichi astana ..sarva kahi sambhalat collage complete kele ..job life madhe struggle kel ahe ..good jotiba ..ani amcha jotya …good bhau ..best luck ..

    • अहो …

      आईच्या अन् बापाच्या व्याख्येत ,,
      जर सुस्वाद नसेल तर ,,
      मुलं गुदमरतात ….

      कोणत्या वाटेचा ,,
      पुढे हमरस्ता होईल हे ,,
      प्रवासाच्या प्रारंभी सांगता येत नाही …

      तेंव्हा मुलाला चालू द्यावं ….
      आईबापानं मुलाच्या मार्गात ,,
      आडवं पडावं , ते सावलीच्या रूपानं..

      बाप मुलाला गाडी देऊ शकतो …
      पण, झोप देऊ शकत नाही …

      आई जेवण देऊ शकते …
      पण , भूक देऊ शकत नाही ….

      हे ज्या पालकांना उमंगल ,,
      त्यांनाच जगाचं जगण्याचं रहस्य समजलं ….

      आणि ,,
      आपल्या आई वडिलांच्या मनातील
      दिव्य स्वप्नाचा दिवा कोणत्याही अडचणींच्या
      वादळात जिद्दीच्या आडोशान मालवू न देता ,
      कर्तृत्वाच्या अग्निबानाने …
      ध्येयाचे गगन भेदून ,,
      यशाचा लखं प्रकाश दिला …

      मनःपूर्वक अभिनंदन …

  • केळेवाडी आणि मठ म्हणजे कडेकपारीच्या, डोंगर रांगांच्या पायथ्याला जंगली श्वापंदांच्या सहवासात तयार झालेली ही पोर जिथे जंगली श्वापदांना घाबरली नाहीत तिथे चिखल, तुटके चप्पल आणि फाटक्या चड्डीला घाबरणाऱ्यातली ही नव्हेतच.
    दिंडेवाडी सारख्या शिक्षण पंढरीत उत्तम सारखे लोक शिकले, खोखो सारखे वेगवान खेळ खेळले आणि आपल्या परिस्थितीलाही लोटांगण घालायला लावलं आणि आज आकाशाला हात लावून पण उत्तमचे पाय जमिनीवरच आहेत. *तरीही म्हणावसं वाटतं आभाळाएवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं,मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडं उचलून घ्यावं* उत्तम उंच शिखरावर आहेच पण अजूनही सर्वोच्च स्थानी पोहोचावा हीच शुभेच्छा. उत्तमचा एक गुरु म्हणून काम केल्याचा सार्थ अभिमान वाटतो.

    जोतिबा तुझ्या लेखणीचा हा वारू असाच चौखूर उधळत राहो आणि आमच्याच विद्यार्थ्यांच्या जीवनगाथा आम्हालाच प्रेरणा देत राहो. तुझ्या लेखणीला म्हणावं असं वाटतं की
    *तु लिहिले ते बरे केले, वेदनांचे या झरे केले
    आठवांचा वाजता वेणु (बासरी) दुःख थोडे हसरे केले*.
    तुलाही मनःपूर्वक शुभेच्छा.
    अजून यशोगाथांची वाट पाहत आहोत

    • आदरणीय शरद पाटील सर,
      तुमची ही कमेंट वाचताना शब्द अपुरे पडत आहेत आणि डोळे पाणावले आहेत. केळेवाडी-मठच्या त्या डोंगरदऱ्यांतून, संघर्षातून इथपर्यंतचा जो प्रवास झाला, त्या प्रवासात तुमच्यासारख्या गुरूंचे मार्गदर्शन लाभले हे माझे सर्वात मोठे भाग्य आहे. तुम्ही दिलेली ‘शिक्षण पंढरीची’ उपमा आणि माझ्या खेळाच्या अन् संघर्षाच्या आठवणींना उजाळा देऊन मला पुन्हा एकदा त्या मातीची आठवण करून दिलीत.
      सर, ‘आभाळाएवढी उंची’ गाठली तरी पाय जमिनीवरच राहावेत, ही शिकवण तुमच्याकडूनच मिळाली आहे. तुमच्या आशीर्वादानेच माझी लेखणी या वेदनांचे आणि संघर्षाचे शब्दरूप मांडू शकली. ‘दुःख थोडे हसरे’ करण्याचा माझा हा प्रयत्न केवळ तुमच्यासारख्या गुरूंच्या प्रेरणेमुळेच यशस्वी होत आहे.
      तुमचा अभिमान सार्थ ठरवण्यासाठी आणि आपल्या मातीतील अशा अनेक प्रेरणादायी गाथा जगासमोर आणण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. माझ्या लेखणीचा हा वारू तुमच्या आशीर्वादाने असाच धावत राहील. तुम्ही दिलेले हे प्रोत्साहन माझ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहे.

      तुमच्या चरणी नतमस्तक!

  • खूप सुंदर, प्रेरणादायी आणि मनाला भिडणारे लिखाण आहे.
    उत्तम शिंदे यांचा हा प्रवास संघर्ष, कृतज्ञता आणि समाजभान यांचा आदर्श नमुना आहे.
    मातीशी नातं न तुटू देता यशाला सामाजिक अर्थ देणं म्हणजेच खरा मानाचा मुजरा.
    अशा व्यक्तिमत्त्वांमुळेच गाव, संस्कृती आणि पुढची पिढी उज्ज्वल होते.

  • खूपच प्रेरक आणि हृदयस्पर्शी मांडणी आहे.
    उत्तम शिंदे यांचा प्रवास यशासोबत माणुसकी जपणारा आहे.
    स्वतःच्या संघर्षातून समाजासाठी काहीतरी देण्याची भावना खरोखरच वंदनीय आहे.
    अशा कार्याला मानाचा सलाम!

  • अतिशय सशक्त आणि प्रेरणादायी लेखन आहे.
    यशाच्या शिखरावर असूनही मातीशी नातं जपणं हीच खरी मोठेपणाची खूण.
    उत्तम शिंदे यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी दीपस्तंभ ठरेल.
    अशा कार्याला मनापासून मानाचा मुजरा.

  • “ही केवळ यशोगाथा नाही, तर आमच्यासारख्या एका गावात, एका शाळेत वाढलेल्या पिढीचं स्वप्न आहे. लेखकही माझा वर्गमित्र आणि ही प्रेरणादायी कथा ज्यांची आहे तो उत्तमही माझाच वर्गमित्र — आम्ही तिघंही १० वीपर्यंत एकाच शाळेत शिकलेलो. त्या काळात संघर्ष दिसत होता, पण आज इतका उज्ज्वल इतिहास लिहिला जाईल याचा अभिमान शब्दांत मांडणं कठीण आहे. उत्तम, तुझं यश फक्त तुझं नाही; ते केळेवाडी, आमची शाळा आणि आमच्यासारख्या सर्व सामान्य मुलांसाठी प्रेरणा आहे. सलाम मित्रा — तुझ्या आई-वडिलांच्या संघर्षाला आणि तुझ्या अथक जिद्दीला 🙏”

Leave a Reply